
मुंबईत गोवर आटोक्यात असला तरी सलग तिसऱया दिवशी गोवरमुळे मृत्यू झाल्याने काळजी वाढली आहे. आज शीव येथील 6 महिन्यांच्या मुलाचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या मुलीला ताप, खोकला, सर्दी असा त्रास होता. दरम्यान, मुंबईत दिवसभरात 13 गोवर संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेने केले आहे.



























































