सनी आणि दीपिकाला खायचंय का?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। पुणे

‘पद्मावत’ फेम दीपिका पदुकोण हीने पोस्ट केलेल्या एका मजेशीर टि्वटने सोशल मीडियावर धमाल उडवली आहे. यात एका यूजरने पुण्यातल्या एका रेस्टॉरंटमधील मेन्यूचा स्क्रीनशॉट शेअर केला असून त्यात लिहलेल्या ‘दीपिका पदुकोण पराठा थाली’ला त्याने हायलाईट केलं आहे. दीपिकाने हसणाऱ्या इमोजीसोबत हा स्क्रीनशॉट टि्वटरवर शेअर केला आहे. गंमत म्हणजे या रेस्टॉरंटमध्ये दीपिकाबरोबरच सनी देओल आणि अनेक सेलिब्रिटींच्या नावाचे पराठे मिळत आहेत. यामुळे आपल्या आवडत्या स्टार्सच्या नावाचा पराठा खाण्यासाठी चाहत्यांची या रेस्टॉरंटमध्ये गर्दी उसळते.

या रेस्टॉरंटमध्ये दीपिका पदुकोण पराठा थालीची किंमत 600 रुपये आहे. दीपिकाबरोबरच सनी देओल, युवराज सिंह, भगत सिंग, अक्षय कुमार, सचिन तेंडुलकर, यो यो हनी सिंग, दारा सिंह, माधुरी दीक्षित, द कुंभर्कण, बाहुबली आणि इंडियाज बिगेस्ट पराठा थालीही मिळत आहे. दरम्यान, दीपिकाचा पती व अभिनेता रणवीर सिंह यानेही त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्किनशॉट शेअर केला आहे. टेक्सास मधील एका रेस्टॉरंटमध्येही दीपिका नावाचा डोसा मिळत असून मी तो डोसा खाल्ला, असं रणवीरने त्याच्या नेहमीच्याच मिश्किल स्टाईलमध्ये म्हटले आहे.