
सामना ऑनलाईन । मुंबई
सध्या कान्स हा चित्रपट महोत्सव चांगलाच गाजतोय. त्यातल्या चित्रपटांपेक्षाही जास्त रेड कार्पेटवरचे लूक जगभरातल्या प्रेक्षकांचं मुख्य आकर्षण ठरतात. म्हणूनच प्रत्येक कलाकार इतरांहून वेगळा दिसण्यासाठी धडपडत असतो. पण, कधीकधी यात चांगलीच फसगतही होते. नेमका याचाच प्रत्यय दीपिका पदुकोण हिला कान्स 2019मध्ये आलाय. तिने घातलेल्या पोपटी रंगाच्या गाऊनमुळे तिला नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलं आहे.
कान्स फिल्म फेस्टिवलच्या तिसऱ्या दिवशी चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी दीपिका अन्य तारेतारकांसह लाल गालिच्यावर अवतरली. यावेळी तिने Giambattista Valli या डिझायनरचा पोपटी रंगाचा गाऊन घातला. त्यावर तिने गुलाबी रंगाचा बो असलेला हेअरबँडही घातला. त्याचे फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केले. काहींनी तिची स्तुती केली तर काहींनी तिच्यावर टीका करायला सुरुवात केली.
तू पोपट दिसतेयस, रणवीर सिंगची हवा लागली का? इथपासून ते माझा आंघोळीचा लुफा (जाळीचा गोळा) सापडला, कधीतरी माणसाच्या मुलीसारखी दिस, अशा अनेक प्रतिक्रिया नेटकरी देताना दिसत आहेत. दीपिकाचा नवरा अभिनेता रणवीरने मात्र आपल्या बायकोचं कौतुक केलं आहे.




























































