दीपिका पदुकोण प्रेग्नंट? अभिनेत्रीच्या सूचक विधानामुळे बी टाऊनमध्ये रंगलीय चर्चा

दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) ही बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेतील जोडी आहे. नुकतेच त्यांच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झाले. हा खास क्षण अविस्मरणीय करण्यासाठी दोघेही इंटरनॅशनल हॉलिडेसाठी गेले होते. याच दरम्यान दोघांनी फॅमिली प्लॅनिंगही केले असून खुद्द दीपिका पदुकोण हिनेच एका मुलाखतीमध्ये याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे दीपिका-रणवीरच्या घरी पाळणा हलणार असल्याची चर्चा बी टाऊनमध्ये रंगली आहे.

दीपिका पदुकोण हिने नुकत्याच एका मुलाखतीमध्ये फॅमिली प्लॅनिंगबाबत विधान केले. तुम्ही दोघं आई-बाबा कधी होणार? काही प्लॅनिंग केलंय का? असे विचारले असता दीपिकाची कळी खुलली अन् तिने नक्कीच आम्ही याचा विचार केल्याचे म्हटले. रणवीर आणि मलाही मुलं आवडतात. आम्ही कुटुंब कधी वाढतंय या दिवसाची आतुरतेने वाट पहात आहोत, असेही ती म्हणाली.

दीपिका पुढे म्हणते, जेव्हा मी त्या लोकांना भेटते ज्यांच्यासमोर मी लहानाची मोठी झाले, जसे की माझी मावशी, काका आणि कौटुंबिक मित्र तेव्हा ते म्हणतात की तू आहे तशीच आहेत. तुझ्यात काहीच बदल झालेला नाही. ते मुलांच्या संगोपनाबाबतही बरंच काही सांगतात.

आम्ही ज्या इंडस्ट्रीत काम करतो तिथे प्रसिद्धी आणि पैशामुळे प्रभावित होणे स्वाभिवक आहे, पण माझ्या घरी कोणी मला सेलिब्रिटीसारखे वागवत नाही. सर्वात आधी मी मुलगी आणि बहीण आहे. मला नाही वाटत की यात कधी बदल व्हावा. माझे कुटुंबच मला जमिनीशी नाळ जुळवून ठेवण्यास मदत करते. मी आणि रणवीर आमच्या मुलांनाही ही शिकवण देऊ, असे दीपिका म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

दरम्यान, कामाबाबत बोलायचं झाल्यास दीपिका पदुकोण शाहरूख खानच्या ‘पठान’ आणि ‘जवान’ चित्रपटामध्ये दिसली होती. आगामी काळात ती सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘फायटर’ चित्रपटातही झळकणार आहे. विशेष म्हणजे ती पहिल्यांदाज अभिनेता हृतिक रोशनसोबत मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. 25 जानेवारी. 2024 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर रणवीर सिंह हृतिक ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटात अखेरचा दिसला होता. आता त्यांच्या ‘सिंघम अगेन’ चित्रपटाचीही चर्चा सुरू आहे.