…जेव्हा भर पार्टीत दीपिका रणवीरची पँट शिवत होती!!

बॉलिवूडची मस्तानी दीपिका पदुकोण आणि तिचा पती रणवीर सिंग यांचा एक स्वतंत्र चाहता वर्ग आहे. त्यांच्यातील अफलातून केमिस्ट्री अनेकांना आवडते. एकमेकांच्या आकंठ प्रेमात असलेल्या दीपिका आणि रणवीरच्या आयुष्यातला एक प्रसंग सध्या चांगलाच चर्चेत येतोय.

या प्रसंगात दीपिकाने रणवीरची मदत केली होती. हा प्रसंग स्वतः दीपिकाने एका कार्यक्रमात बोलून दाखवला होता. त्याचं झालं असं की, दीपिका आणि रणवीर हे दोघंही बार्सिलोना येथे एका म्युझिक कॉन्सर्टला गेले होते. तिथे जाण्यासाठी रणवीरने सैलसर पँट घातली होती. मात्र, नाचता नाचता त्याची पँट फाटली.

आता चारचौघांत नवऱ्याची लाज राखण्यासाठी दीपिका पुढे सरसावली. तिने तिच्यासोबत असलेल्या सुईधाग्याने त्याची पँट शिवली. आजूबाजूला सगळे नाचत होते आणि त्या भर पार्टीतच दीपिका रणवीरची पँट शिवत बसली होती. दीपिकाने हा प्रसंग सांगताना या घटनेचा पुरावा म्हणून एक फोटोही दाखवला.

या प्रसंगाचा व्हिडीओ व्हायरल होत असून अनेक नेटकरी दीपिकाचं यासाठी कौतुक करत आहेत. तसंच रणवीर हा खूप भाग्यवान नवरा असल्याचंही ते म्हणत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या