डॉ. मनमोहन सिंगांना अमृतसरसाठी गळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी लोकसभेची निवडणूक अमृतसर मतदारसंघातून लढवावी यासाठी त्यांना काँग्रेस नेत्यांनी गळ घातली आहे. सिंग यांनी शिखांचे पवित्रस्थळ असलेल्या अमृतसरमधून निवडणूक लढवली तर पंजाबच्या जनतेला आनंद होईल, असे पंजाब काँग्रेसने म्हटले आहे.

मनमोहन सिंग हे 1991 सालात आसामातून राज्यसभेवर पहिल्यांदा निवडून गेले होते. 1999 सालात त्यांनी लोकसभेची निवडणूक दक्षिण दिल्लीतून लढवली होती. पण भाजपचे व्ही. के. मल्होत्रा यांनी त्यांना पराभूत केले होते. मनमोहन सिंग यांनी अमृतसरमधून लढण्याच्या काँग्रेस नेत्यांच्या विनंतीला अद्याप सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. 2009 मध्येही त्यांनी हीच विनंती करण्यात आली होती. पण प्रकृतीचे कारण देत त्यांनी नकार दिला होता.