सोशल मीडियातील चमकेगिरी भोवली; भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा अडचणीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sambit-patra-bjp

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांना सोशल मीडियातील ‘चमकेगिरी’ने अडचणीत आणले आहे. त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासंबंधी बनावट व्हिडीओ सोशल मीडियात पोस्ट केला होता. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिल्लीतील न्यायालयाने दिले आहेत.

संबित पात्रा यांनी केजरीवाल यांची प्रतिमा मलीन केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी ‘आप‘च्या पदाधिकाऱयांनी जानेवारीमध्ये पात्रा यांच्याविरुद्ध दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र त्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यामुळे ‘आप’ने न्यायालयाचे दार ठोठावले होते. पक्षाच्या तक्रारीची गंभीर दखल घेत दिल्लीतील एका कनिष्ठ न्यायालयाने पात्रा यांच्यावर गुन्हा नोंदवण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. पात्रा यांनी 30 जानेवारीला अरविंद केजरीवाल यांच्यासंबंधित व्हिडीओ स्वतःच्या ट्विटर हॅण्डलवरून शेअर केला होता. त्यात केजरीवाल हे कृषी कायद्यांचे समर्थन करताना दाखवले होते. ‘आप’ने तो व्हिडीओ बनावट असल्याचा दावा केला होता.