
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
16 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीत झालेल्या निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणामुळे सारा देश हादरला होता. या सामूहिक बलात्कारावर आधारित दिल्ली क्राईम ही वेबसिरीज शुक्रवारी नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात आली. सात भागांच्या वेबसिरीजमधूल निर्भयावरील बलात्कारापासून देशभरातील बलात्काराविरोधातील लढ्यापर्यंत दाखविण्यात आले आहे.
Discover the story behind the crime that changed the nation. Delhi Crime is now streaming only on Netflix. pic.twitter.com/NrHvXSDIYn
— Netflix India (@NetflixIndia) March 22, 2019
रिची मेहता यांचे दिग्दर्शन असलेल्या या वेबसिरीजमध्ये शेफाली शाह प्रमुख भूमिकेत असून यात रसिका दुगल, अदिल हुसेन, राजेल तैलंग हे कलाकार देखील दिसणार आहेत.





























































