
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
जगमित्र साखर कारखाना जमीन हडपप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने मुंडे यांना दिलासा मिळाला आहे.
मुंडे यांच्यासह 14 जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने मंगळवारी दिले होते. यानुसार शुक्रवारी सकाळीच मुंडे यांच्या विरोधात बर्दापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.


























































