
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्वच क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना आजही समाजाच्या अपमानास्पद वागणूकीचा सामना करावा लागत आहे. अशीच एक घटना नवी दिल्लीत घडली आहे. नाईट शिफ्ट करून रात्री उशीरा घरी परतणाऱ्या एका महिला आर जेचा सुरक्षा रक्षक व कामगार कल्याण विभागाच्या अध्यक्षांनी विनयभंग केल्याचे समोर आले आहे. तिच्या कामावरून उशीरा येण्यावरून तिच्याबद्दल अपशब्दही वापरले असा आरोप या आरजेने केला आहे.
ही महिला दिल्लीतील ग्रेटर कैलाश येथे आई वडील व आपल्या मुलाबरोबर राहते. नाईट शिफ्ट असल्याने ती रात्री उशीरा घरी परतते. पण तिच्या उशीरा येण्यावरूनच कॉलनीच्या सुरक्षा रक्षकाने तिला गेटवरच अडवले. इतक्या रात्री कुठलीही महिला कशी एकटी घरी येते. तू नक्की काय काम करतेस. तेही मला महित नाही. असे म्हणत त्याने तिला कॉलनीत येण्यास रोखले. तसेच कामगार कल्याण विभागाचे अध्यक्ष मिकी बेदी देखील यांनीदेखील आपल्याबरोबर गैरवर्तन करत आक्षेपार्ह शेरेबाजी केली असा आरोप महिलेने केला आहे. तसेच या दोघांनी आपले चारित्र्य हनन केल्याचेही तिने म्हटले आहे. याप्रकरणी ग्रेटर नोएडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली असून अद्याप संबंधितांवर एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही.
महिलेच्या आईने ही तक्रार दाखल केली आहे. माझी मुलगी मीडिया कर्मचारी असून सिंगल मदर आहे. रात्री उशीर ती कामावरून घरी येते. यावरून आरोपी गेल्या अनेक दिवसांपासून तिला टोमणे मारतोय.घरात मी व माझे यजमान असे दोन ज्येष्ठ नागरिक असून आम्हाला ही एकच मुलगी आहे. तरी कृपया संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी अशी विनंती आरजेच्या आईने पोलिसांना केली आहे.



























































