Delhi Bomb Blast – बॉम्बस्फोटातील कार आमची नाही, आमची मुलं दिल्लीला गेलीच नाहीत; कुटुंबीयांचा दावा

सोमवारी (10 नोव्हेंबर) संध्याकाळी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ एक भीषण स्फोट झाला. हा स्फोट चालत्या कारमध्ये झाला असून, आतापर्यंत या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच यामध्ये 25 हून अधिक जखमी झाले आहेत. या जखमींपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

लाल किल्ल्याजवळ ज्या कारमध्ये स्फोट झाला ती आय 20 होती. स्फोट प्रकरणी सोमवारी रात्री जम्मू आणि काश्मीरमधील उमर आणि आमिर या दोन तरुणांना अटक करण्यात आली. ज्यात उमर मोहम्मद नावाच्या डॉक्टरचा समावेश आहे. त्यांच्या अटकेवर कुटुंबाने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

स्फोटात वापरलेली कार हरियाणा नोंदणीची असून तिचा मालकी हक्क अनेकदा बदलल्याचे तपासात समोर आले आहे. कार चालकाचे नाव डॉ. मोहम्मद उमर असे आहे. उमर हा फरिदाबाद मॉड्यूलशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. मात्र दिल्ली स्फोटातील कार आमची नाही, आमची मुलं दिल्लीला गेलीच नाहीत असा दावा उमरच्या कुटुंबियांनी केला आहे. आमची गाडी घरातील पार्किंगमध्ये असल्याचा दावा उमरच्या कुटुंबियांनी केला आहे.

दिल्लीतील आय 20 कारमध्ये आत्मघाती हल्ला झाला होता. यावेळी स्फोटाच्या तीन तास आधी कार सुनहरी मस्जिदजवळ पार्किंगमध्ये होती. पार्किंगमधून कार बाहेर पडल्यावर 4 मिनीटांनी स्फोट झाला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचे गूढ अधिकच वाढले आहे.