मातीचा एसी उन्हाळय़ात ठेवेल कूssल

उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेत. सूर्यदेव आग ओकत आहे. उकाडय़ामुळे लोक हैराण आहेत. अशा परिस्थितीत सगळ्यात जास्त मागणी असते की एसी आणि कूलरला. घर थंडगार ठेवण्यासाठी मार्केटमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे एसी-कुलर उपलब्ध आहेत. पण तुम्ही कधी मातीच्या एसीबद्दल ऐकलंय का. आश्चर्य वाटून घेऊ नका. खरंच मातीचा एसी आहे. त्यामध्ये खोलीचे तापमान सहा डिग्रीपर्यंत कमी राहील, अशी कुलिंग सिस्टीमदेखील आहे.

मातीचा एसी बनवण्यासाठी टेरोकोटा टेक्नॉलॉजी आणि पारंपरिक मातीच्या ‘कुलिंग’ यंत्रणेचा वापर केला आहे. पाण्याच्या मदतीने मातीला थंड केले जाते. त्यासाठी टेराकोटा टय़ूबवर पाणी सोडले जाते. त्यानंतर जी हवा बाहेर येते ती खूप थंड असते. मातीचा एसी अगदी नैसर्गिकरीत्या थंडगार करतं. एवढेच नव्हे तर ते पर्यावरणपूरक आहे. याचे डिझाईन दिल्लीचे आर्किटेक्ट मोनीश शिरीपूरपू यांनी बनवले आहे. त्याची रचना मधमाश्यांच्या पोळ्यासारखी दिसते. जागा आणि तापमानानुसार मातीचे एसी कस्टमाइज्ड करूनही बनवले जातात.

आपली प्रतिक्रिया द्या