ममुराबाद येथे विकास कामांचे सहकार राज्यमंत्री पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

30

सामना प्रतिनिधी । जळगाव

जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथे सिमेंट रस्ते, डांबरी रस्ते तसेच विविध विकास कामांचे भूमिपूजन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे हे होते.

ममुराबाद व परिसरातील गावाच्या विकास सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावे. त्यासाठी निधीची कमतरता भासु देणार नसल्याची ग्वाही सहकार राज्यमंत्री पाटील यांनी दिली. जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील ममुराबाद येथील नागरिक, शिवसैनिक व स्थानिक लोकप्रतिनिधीनी केलेल्या मागणीनुसार सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी गावातील विकास कामांसाठी लाखोंचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये प्रामुख्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे, आदिवासी बांधवांच्या वस्तीमध्ये कॉंक्रीटीकरण, वार्ड क्रमांक ५ व ६ मध्ये अल्पसंख्याक विकास योजनेतून रस्त्यांचे डांबरीकरण या कामांचा समावेश आहे. या सर्व कामांचे भूमिपूजन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवराय व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी सहकार राज्यमंत्री पाटील यांचा सत्कार केला.यावेळी मामुराबाद गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकजूटीने प्रयत्न करावे.गावासाठी निधीची कमतरता भासु देणार नसल्याची ग्वाही सहकार राज्यमंत्री पाटील यांनी दिली.

यावेळी जिल्हापरिषद सदस्य पवन सोनवणे, रवींद्र देशमुख, पंचायत समिती सदस्य नंदलाल पाटील, जनाप्पा कोळी, कृउबाचे संचालक वसंत भालेराव , बंडू पाटील, राजेंद्र चव्हाण, विभाग प्रमुख रावसाहेब पाटील, सरपंचा रमाबाई सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य शरद पाटील, राहुल डाके, शेख सईद, तेजस पटेल, विजय शिंदे, सादिक पटेल, प्रमोद शिंदे, विलास सोनवणे, ज्ञानेश्वर सावळे, भागवत सोनवणे, नितीन सोनवणे, राजू साळुंके, भीमा चव्हाण साठे यांच्यासह ममुराबाद परिसरातील पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या