विकासकामात कोणताही अडथळा येऊ देणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य सरकार म्हणून ज्या ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे तिथे प्रत्येक पावलावर आपण एकमेकांसोबत राहून महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम करू. हे करताना जनतेचे हित आणि राज्याच्या विकासाआड कुणालाही येऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आज दिली.

नागपर मेट्रोच्या सीताबर्डी ते कस्तुरचंद पार्क या मार्गाचे आणि फ्रीडम पार्कचे मुख्यंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदीप सिंह पुरी, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री नितीन राऊत, दुग्धव्यवसाय मंत्री सुनील केदार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अन्य स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

”माणसे जोडताना आपण सगळेजण आपले राजकीय जोडे बाहेर काढून एकत्र येतो ही महाराष्ट्राची आणि देशाची संस्कृती आहे.” – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

विकासकामात त्रुटी नको

नागपूर ही राज्याची उपराजधानी आहे. हे देशातील आणि जगातील उत्तम शहर व्हावे यासाठी आपल्या सर्वांचे प्रयत्न आहेत. जलदगतीने विकासकामे करताना त्यात त्रुटी राहणार नाही याची काळजी घेऊन आपण एकमेकांच्या सहकार्याने पुढे जाऊ या असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

नागरिकांच्या सूचना विचारात घ्या

प्रगती आणि विकास जलदगतीने साधण्यासाठी दळणवळणाच्या साधनांचा विकास करणे अत्यावश्यक आहेच. त्यामुळेच आपण राज्यात मेट्रोचे, महामार्गांचे जाळे विणत आहोत; पण हे करताना नागरिकांच्या सूचनाही विचारात घ्याव्यात, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

फ्रीडम पार्कचे उद्घा

देशाच्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षाच्या निमित्ताने झीरो माईल स्थानकाच्या भोवताली 40 हजार चौरस फूट जागेवर फ्रीडम पार्कचे निर्माण झाले आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी या फ्रीडम पार्कचेदेखील उद्घाटन करण्यात आले.