शिवसेनेचा भाजपला धक्का! देवगड नगरपंचायतीच्या दोन नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देवगड-जामसंडे नगरपंचायतीतील भाजपाच्या दोन नगरसेवकांनी गुरुवारी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भाजपाचे नगरसेवक हर्षा ठापूर आणि विकास कोयंडे यांनी  शिवबंधन बांधले. पालकमंत्री उदय सामंत, सिंधुदुर्ग शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत,  संदेश पारकर, अतुल रावराणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश करण्यात आला आहे. यावेळी देवगड तालुकाप्रमुख विलास साळसकर मिलिंद साटम, अॅड. हर्षद गावडे, बुवा तारी उपस्थित होते.