
सामना प्रतिनिधी। देवणी
देवणीत अतिक्रमण हटाव मोहीम जोरात सुरू असून २० वर्षांपासूनची अतिक्रमणे या मोहीमेत हटवण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद आणि नगर पंचायत देवणी यांच्या सुंयुक्त विद्यमाने ही मोहिम राबवण्यात आली.
देवणी येथील वाढत्या अतिक्रमणांमुळे नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. रस्ते अरुंद होत होते, वाहतूकीची कोंडी होत होती. त्यामुळे अतिक्रमणे काढण्याची मागणीही सातत्याने होत होती. त्यामुळे नगरपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहिम सुरु करण्यात आली आहे. शहरातील उदगीर – निलंगा रोडवरील तसेच बसस्थानक परिसरातील, बैल बाजार रस्त्यावरील, बोरोळ रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात करण्यात आली. मंगळवारी ही अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरुच राहणार आहे.





























































