बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भक्तीचा पूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अष्टविनायकातील बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. शनिवार, रविवार, सोमवारी सलग आलेल्या सुट्टय़ांमुळे भाविकांच्या भक्तीचा पूर पाहायला मिळाला. नाताळ, नवीन वर्षाचे स्वागत, विविध सहली आणि 13 फेब्रुकारीला असलेला माघी गणेशोत्सव यामुळे आगामी दीड महिना पालीत भाविकांची प्रचंड गर्दी राहणार आहे.

बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने वाहने पार्क करण्यासाठी देवस्थानची दोन भव्य मोफत पार्किंगदेखील आहे. तसेच सुसज्ज स्वच्छतागृहदेखील उभारण्यात आले आहे. भाविकांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. रांगेत उभे राहण्यासाठी रेलिंग व शेड उभारण्यात आली आहेत, अशी माहिती बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जितेंद्र गद्रे यांनी दिली.