
देवरुख मध्ये कृषी सहाय्यक या पदावर गेली चार वर्षे कार्यरत असणाऱ्या तरुणीने आत्महत्या केली आहे. पूजा शिवकुमार रजपूत (वय-२८, मुळ गाव उस्मानाबाद, सध्या रा. देवरूख, ता. संगमेश्वर) असे आत्महत्या केलेल्या तरूणीचे नाव आहे.
आत्महत्येचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट असल्याचे सांगण्यातa आले . पूजा रजपूत ही संगमेश्वर तालुका कृषी कार्यालयात कृषी सहाय्यक पदावर गेली चार वर्षे कार्यरत होती . या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच देवरूख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले .देवरूख पोलीसांकडून घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे .




























































