दबावाला झेलण्याची प्रेरणा धोनीमुळेच; गुकेशने केला गौप्यस्फोट

हिंदुस्थानी बुद्धिबळाचा नवा स्टार असलेला गुकेश दोम्माराजूसुद्धा कुल क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीचा चाहता आहे. धोनी आणि टेनिसस्टार नोव्हाक जोकोविच यांच्या शांतपणे दबाव झेलण्याच्या वृत्तीमुळेच मला बळ मिळाले आहे. त्यांचीच प्रेरणा घेत मी माझ्या खेळात प्रचंड दबावानंतरही शांतपणे खेळ करू शकलो असल्याचा खुलासा गुकेशने केला.

दोन दिवसांपूर्वीच गुकेशने गॅरी कास्पारोव्हचा चार दशकांपूर्वीचा सर्वात कमी वयात पँडिडेट्स स्पर्धा जिंकण्याचा विश्वविक्रम मोडीत काढला होता. विजयानंतर मायदेशी परतल्यानंतर गुकेशने धोनी आणि जोकोविचचा दबावाखाली खेळण्याच्या वृत्तीपासून आपणही प्रेरणा घेतल्याचे सांगितले. हे महान खेळाडू प्रचंड दबावाची स्थिती असतानाही स्वतःला या दबावाला शांतपणे झुगारण्यात यशस्वी ठरतात. याच जोरावर देत आपली सर्वोत्तम कामगिरी करतात. या दोघांपासून मी नेहमीच प्रेरणा घेतली आहे. धोनीने हिंदुस्थानला सर्व जागतिक स्पर्धा जिंकून दिल्या आहेत तर जोकोविचने 24 ग्रॅण्डस्लॅम जिंकण्याचा पराक्रम केला आहे. ते अनेक युवकांचे प्रेरणास्रोत आहेत आणि मीही त्या युवकांपैकीच एक असल्याचे गुकेश अभिमानाने म्हणाला.