मी गटारं साफ करून घ्यायला खासदार झाले नाही – साध्वी प्रज्ञा ठाकूर

173
sadhvi-pragya-singh-thakur

सामना ऑनलाईन । सेहोर

भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी आज एका बैठकीत बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ‘मी तुमची गटारं साफ करून घ्यायला खासदार झालेली नाही’, असे वक्तव्य त्यांनी या बैठकीत केले आहे. त्यांच्य़ा या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘मी तुमची गटारं साफ करून घ्यायला खासदार नाही झाले. मी शौचालय साफ करून घेण्यासाठी खासदार बनलेले नाही. मी ज्या कामासाठी बनले आहे ते काम मी अगदी प्रामाणिकपणाने करत आहे’, असे वक्तव्य खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या