
राज्यातील सामाजिक शांतता धोक्यात येणारी वक्तव्ये कुणीही करू नयेत, आगामी सण, उत्सव कालावधीत काही घटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत असतील, तर त्यांच्यावर जरब बसवावी असे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज दिले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती, हनुमान जयंती, गुड प्रायडे, इस्टर संडे या सर्व सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दिलीप वळसे पाटील यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला. अतिशय संवेदनशील असलेल्या विभागामध्ये विशेष खबरदारी घेण्यात यावी. पुरेसा बंदोबस्त तैनात ठेवावा तसेच काटेकोर नियोजन करावे, असे निर्देशही वळसे पाटील यांनी यावेळी दिले.
सोशल मीडियाकर लक्ष
सोशल मीडियावर देखील विशेष लक्ष ठेवण्यात यावे. आक्षेपार्ह पोस्ट, संदेश प्रसारित करणाऱयांवर प्रतिबंधक कारवाई करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. तसेच अनुचित प्रकार करणाऱयाविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी वरिष्ठ अधिकाऱयांना दिले. जनतेने पोलिसांना सहकार्य करावे. अफवा अथवा चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नये. असे आवाहन वळसे पाटील यांनी यावेळी केले.



























































