हिंदुस्थानींची अस्वच्छतेची सवयच देतेय कोरोनाशी लढण्याचे बळ! ऐकावे ते नकलच!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना महामारीने जगातील भल्या भल्या देशांना पार हतबल करून टाकले आहे. पण हिंदुस्थानात मात्र कोरोना मृत्युदर अन्य देशांच्या मानाने अत्यल्प आहे. त्यामागचे कारण आपल्याला नवल वाटावे असेच आहे. कारण बहुतांश प्रतिकूल आणि अस्वच्छ वातावरणात राहण्याची हिंदुस्थानी नागरिकांच्या सवयीनेच त्यांची कोरोनाला प्रतिबंध करण्याची प्रतिकारशक्ती वाढल्याचा निष्कर्ष पुण्यातील नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर सेल सायन्सेस आणि चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिटय़ूटच्या वैज्ञानिकांनी एका अभ्यासाद्वारे काढला आहे.

जगभरात कोरोना विषाणूच्या संसर्गाने थैमान घेतलेले असताना हिंदुस्थान जगातील दुसरा सर्वाधिक संसर्गाचा फटका बसलेला देश ठरला आहे. याबाबत आपल्यापुढे आता केवळ अमेरिका हाच देश आहे. एकटय़ा हिंदुस्थानात जगभरातील एक षष्ठांश कोरोना संसर्गाची प्रकरणे आढळली आहेत. मात्र, कोरोनामुळे हिंदुस्थानातील मृत्यूचे प्रमाण हे जगभरातील सर्वाधिक कमी म्हणजे केवळ दोन टक्क्यांहूनही कमी आहे. यामागे हिंदुस्थानींची अस्वच्छतेची सवयच कारणीभूत असल्याचे एका अभ्यासातुन स्पष्ट झाले आहे. कोरोनाशी लढण्यासाठीची प्रतिकारशक्ती हिंदुस्थानी नागरिकांत आपल्या अस्कच्छतेच्या सकयी आणि वर्षानुवर्षे प्रतिकूल वातावरणात राहिल्यामुळे तयार झाल्याचा दावा पुणे आणि चेन्नईच्या संशोधकांनी केला आहे.

ही आहेत कारणे हिंदुस्थानींच्या भक्कम इम्युनिटीची
कोविड-19 विषाणूशी लढण्याच्या प्रतिकारशक्तीबाबत संशोधन केले असता संशोधकांना हिंदुस्थानींच्या भक्कमची अजब कारणे दिसून आली. या अभ्यासानुसार, स्वच्छतेबाबतचा निष्काळजीपणा, स्वच्छ पिण्याच्या पाण्याचे कमी प्रमाण आणि अस्वच्छ परिसर अशा परिस्थितीत हिंदुस्थानी बऱयाच काळापासून राहत असल्याने हीच बाब त्यांना महामारी असलेल्या कोविड-19 आजारापासून दूर ठेवत आहे. त्याचबरोबर इतरही संशोधनांमधून ही बाब समोर आली आहे की, ज्या देशातील लोक कमी आणि मध्यम स्वरुपाच्या वेतनाकर काम करतात त्यांच्यामध्ये कोविडशी लढण्याची प्रतिकारशक्ती आणि इच्छाशक्ती जगातील अन्य सुखवस्तू नागरिकांपेक्षा अधिक आहे.

सुखवस्तू आणि श्रीमंत देशांतील नागरिकांना हाल अपेष्ठाची सवय नसते. त्यामानाने गरिबी आणि अस्वच्छ वातावरणात अनेक कर्षे राहणाऱया नागरिकांची रोगप्रतिकारकशक्ती अनेकपटीनी अधिक असते. त्याचाच लाभ हिंदुस्थानी नागरिकांना कोरोनाविरुद्ध लढण्यात मोठे बळ मिळण्यात झालाय.
-शेखर मांडे, एनसीसीएमचे माजी संचालक