
मोमोज खवय्यांसाठी ही बातमी आहे. लाल चटणीसोबत गरमागरम मोमोज खाण्याची आवड असलेल्यांसाठी ही बातमी आहे. एका 50 वर्षीय इसमाची मोमज खाऊन जीव गेल्याची बातमी समोर आली आहे. एम्स रुग्णालयाच्या तज्ज्ञांनी मोमोज खाणाऱ्यांसाठी सूचक इशारा दिला आहे.
एम्सच्या तज्ज्ञांनुसार, मोमोज भरपेट खा, पण ते गिळताना सावधपणे गिळा. मोमोज नीट चावून न खाता ते गिळल्यात पोटात अडकू शकतात. ज्याने तुमचा जीवही जाऊ शकतो. एम्सच्या फॉरेन्सिक अहवालानुसार मृत इसमाचे वय 50 वर्ष आहे. तो मद्यधुंद अवस्थेत होता आणि तो दुकानात मोमोज खात होता. खाता खाता तो अचानपणे जमिनीवर पडला. त्याच्या शवविच्छेदनाचा अहवालाचा उल्लेख करत फॉरेन्सिक तज्ज्ञांनी सांगितले की, त्या इसमाच्या श्वासनलिकेत मोमोज अडकले. त्याने श्वासनलिका बंद पडून त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. या समस्येला न्यूरोजिकल कार्डिएक अरेस्ट बोलले जाते.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आपण जेव्हा अशा काही गोष्टी खातो, ज्याचा आकार मोठा असतो किंवा ज्याचा पोटात जाऊन आकार फुलतो. अशा कुठल्याही गोष्टी खाताना त्या नीट चावून खाव्यात. काहीवेळेला काही पदार्थ नीट चावून न खाल्ल्याने अन्न श्वासनलिकेत जाऊन अडकण्याची शक्यता असते. त्याने श्वासनलिका बंद होऊ शकतो. त्याने जीव जाण्याचा धोकाही असतो.



























































