
सामना ऑनलाईन । गुजरात
डॉक्टर देवाचा रुपं असतो असं मानलं जात. पण गुजरातमधील बडोदा य़ेथे कपांऊडरच्या मदतीने डॉक्टर महिला रुग्णांवर लैंगिक अत्याचार करत असल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. डॉक्टर व कंपाऊंडर रुग्णांना गुंगीचे औषध देत होते. नंतर त्यांच्यावर बलात्कार करायचे. एवढेच नाही तर त्याचा व्हिडीओ काढून त्यांना ब्लॅकमेल करायचे.
बडोद्यातील एका दवाखान्यात येणाऱ्या महिलांना औषधांच्या माध्यमातून गुंगीचे औषध दिल जातं होत. त्यामुळं महिलांच्या बेशुध्दीचा फायदा तेथील डॉक्टर व कपांऊडर घेत होते.या महिलांवर बलात्कार करून त्यांचे मोबाईलवर अश्लील वीडिओ तेथील कपांऊडर बनवत होता. जेव्हा पिडीत महिला पुन्हा दवाखान्यात उपचाराकरता यायची तेव्हा तो वीडिओ दाखवून पुन्हा त्या महिलेवर बलात्कार केला जात होता.तसंच या महिलांचे अश्लील वीडिओ ते दोघे सोशल मीडियावर व्हायरल करत होते. या बाबत पोलिसांत पीडित महिलेच्या घरातल्यांनी आरोपी डॉक्टर व कपांऊडर यांच्या विरूध्द पोलिसांत तक्रार केली आहे.
पोलिसांनी या दोघा आरोपींना अटक केली आहे. तसंच या घटनेच्या तपासा दरम्यान कपाऊंडरच्या मोबाईलमध्ये ४६ तर डॉक्टरकडे १३५ असे बलात्काराचे वीडिओ सापडले आहेत. यापूर्वीही हे दोघे दवाखान्यात येणाऱ्या महिलांवर बलात्कार करत होते असं पोलिसांनी सांगितलं आहे. तसंच या दोघांवर लवकारात लवकर कारवाई होईल असंही पोलिसांनी स्पष्ट सांगितलं आहे.

























































