‘कोरोना’त कमावले! ‘डोलो’ गोळय़ांच्या कंपनीवर धाडी, आयकर विभागाची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना काळात तुफान विक्री झाल्याने चर्चेत आलेल्या ‘डोलो-650’ या गोळीची निर्माता कंपनी मायक्रो लॅब आणि मालकांच्या घर, कार्यालयावर आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत.

आयकर विभागाच्या सूत्रांनुसार ‘डोलो’ संबंधित 40 ठिकाणी आयकर विभागाच्या 200 अधिकाऱयांनी आज छापे मारले. यामध्ये नवी दिल्ली, सिक्कीम, पंजाब, तामीळनाडू आणि गोवा येथील कंपनीची कार्यालयेदेखील आहेत. मायक्रो लॅब्सचे मालक सीएमडी दिलीप सुराना आणि संचालक आनंद सुराना यांच्या घरांवरही छापेमारी करण्यात आली आहे.

छापेमारीवेळी आयकर विभागाच्या अधिकाऱयांनी बंगळुरूच्या माधवनगरमध्ये रेसकोर्स रोडवर असलेल्या कंपनीच्या कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्रे तपासली आहेत. करचोरीप्रकरणी ही छापेमारी करण्यात आली आहे. कंपनीने 2020 मध्ये कोरोना काळात 350 कोटी रुपयांच्या गोळय़ा विकल्या याचबरोबर सर्व प्रतिस्पर्धी कंपन्यांना मागे टाकत 400 कोटींची विक्रमी कमाई केली होती.