धक्कादायक! त्या करोनाग्रस्त तरूणाने लावली हळद आणि लग्नाला हजेरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डोंबिवलीत सापडलेल्या त्या कोरोनाग्रस्त तरुणाने होम क्वारंटाईन असताना हळद आणि लग्न समारंभात हजेरी लावली होती अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. याची गंभीर दखल घेत पोलिसांनी त्याच्या सह लग्नाच्या आयोजक व आणखी एका वर गुन्हा दाखल केला आहे.

डोंबिवली पूर्वेला राहणारा हा तरूण 15 मार्चला तुर्कस्थानवरून आला होता. मुंबईत आल्यावर त्याला होम क्वारंटाईनमध्ये राहण्यास सांगण्यात आले होते. पण क्वारंटाईनमध्ये न राहता त्याने 18 आणि 19 मार्च रोजी चुलत भावाच्या  हळद आणि लग्न सोहळयाला हजेरी लावली होती.  त्यानंतर त्याला सर्दी व खोकल्याचा त्रास झाल्याने त्याला मुंबईच्या कस्तुरबा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे. सुदैवाने त्याच्या कुटुंबीयांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मात्र निष्काळजीपणा केल्याने पोलिसांनी त्या तरूणावर व लग्न सोहळा आयोजकांवर व त्या लग्नासाठी जागा उपलब्ध करून देणारे असे तीन जणांवर कारवाई केली आहे.