घरगुती गॅसच्या दरात साडेसहा टक्क्यांनी वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारने पुन्हा एकदा सर्वसामान्यांना महागाईचा झटका दिला आहे. घरगुती नैसर्गिक वायूचे दर 6.5 टक्क्यांनी वाढवले आहेत. सप्टेंबरमध्ये प्रति मेट्रिक मिलियन ब्रिटिश थर्मल युनिट (एमएमबीटीयू)चा दर 715 रुपये होता तो आता ऑक्टोबरसाठी 765 रुपये करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सीएनजी आणि पीएनजी गॅस वापरणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार असल्याचे निश्चित झाले आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने घरगुती नैसर्गिक वायूच्या किमतीत वाढ केल्याचे म्हटले आहे. सरकारने घरगुती नैसर्गिक वायूच्या किमतीत वाढ केल्याने सलग दुसऱ्या महिन्यात दरवाढ केल्याचे निश्चित झाले आहे. घरगुती नैसर्गिक वायूच्या किमतीत झालेल्या या वाढीमुळे गॅस वितरण कंपन्यांच्या खर्चात वाढ होणार असून त्याचा भार ग्राहकांवर पडणार आहे.