लॉगिनसाठी डबल व्हेरिफिकेशन, व्हॉट्सअॅपवरची सुरक्षा आणखी मजबूत होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

व्हॉट्सअॅप युजर्सच्या सुविधेसाठी नवनवीन फीचर घेऊन येते.  आता तर लॉगिन प्रक्रिया अधिक मजबूत करण्यासाठी व्हॉट्सअॅप काम करत आहे. त्यासाठी डबल व्हेरिफिकेशन कोड दिला जाणार असल्याचे समजते.

अकाऊंट लॉगिन करताना व्हॉट्सअॅपला अधिक संरक्षण देण्याची तयारी सुरू आहे. हे नवीन फीचर अँड्रॉईड आणि आयओएससाठी उपलब्ध असेल. डब्ल्यूएबीटाइन्पह्च्या अहवालानुसार, व्हॉट्सअॅप अकाऊंटमधील आपल्या वैयक्तिक तपशिलांचा गैरवापर टाळण्यासाठी डबल व्हेरिफिकेशन कोडसह लॉगिन प्रक्रिया मजबूत करण्यात आली आहे. जेव्हा तुम्ही पह्नवरून व्हॉट्सअॅपवर लॉगिन कराल तेव्हा चॅट सुरू करण्यासाठी पिंवा त्यांचा बॅकअप घेण्यासाठी नोंदणीकृत मोबाईल नंबरवर सहा अंकी कोड पाठवला जाईल. म्हणजे या सहा अंकी कोडशिवाय लॉगिन प्रक्रिया पूर्ण होणार नाही. तसेच आपले अकाऊंट दुसरीकडे लॉगिन होत असल्याचा ‘अॅलर्ट’देखील युजर्सला मिळेल.