
सामना ऑनलाईन । मुंबई
विनंती अर्ज समितीच्या बैठकीत मंत्रालयातील अधिकाऱयांनीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या जमिनी हस्तांतरणाची प्रक्रियाच पूर्ण झाली नसल्याची बाब समोर आणली. यामुळे आंबेडकरी जनतेत नाराजी निर्माण होईल या भीतीने सरकार खडबडून जागे झाले. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी तातडीने इंदू मिल येथील जागेची पाहणी करीत स्मारकाचे काम १४ एप्रिल २०२० पर्यंत पूर्ण होणारच असल्याचे स्पष्टीकरण केले आहे. विधान परिषद सभापती माणिकराव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विनंती अर्ज समितीची बैठक झाली. या बैठकीत अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीत जमीन हस्तांतरणाची औपचारिकता पूर्ण झाली नसल्याचे तसेच स्मारकाची सुमारे २.५ एकर जागा सीआरझेडच्या कचाटय़ात अद्यापही असल्याचे समोर आले होते. या पार्श्वभूमीवर बडोले यांनी इंदू मिलची पाहणी करून या संपूर्ण जमिनीचे हस्तांतरण पूर्ण झाले आहे. स्मारकाच्या उभारणीसाठी निकिदा प्रक्रिया पूर्ण होऊन मे. शापूरजी पालनजी कंपनीला काम मिळाले आहे. बांधकामाला प्रत्यक्ष सुरुकातही झालेली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम नियोजित केळेतच पूर्ण करण्यात येईल असे सांगितले.


























































