डॉ. प्रतिभा बागवे यांना  ‘महा अ‍ॅक्युपंक्चर रत्न’ पुरस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन व ए.जी.एम.ए. यांच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्या दरम्यान सुप्रसिद्ध अॅक्युपंक्चरतज्ञ, संशोधक डॉ. प्रतिभा बागवे यांना ‘महा अॅक्युपंक्चर रत्न’ या प्रतिष्ठत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर येथील यशवंतराव चव्हाण नाटय़गृहात हा सोहळा उत्साहात पार पडला.

डॉ. प्रतिभा बागवे यांनी अॅक्युपंक्चर क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असून तीन दशकांहून अधिक काळ रुग्ण सेवा केली आहे. त्यांनी केलेले क्लिनिकल रिसर्च, फ्री मेडिकल पॅम्प्स, वर्पशॉप्स, ऑनलाईन लेक्चर्स, लेखमाला या कार्याची दखल घेत त्यांना ‘महा अॅक्युपंक्चर रत्न’ देऊन त्यांना गौरविण्यात आले. चित्रपट अभिनेता सुयोग गोरे व राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष अॅड. नाझेर काझी यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. या वेळी अॅड. नागेश सोनवणे, अॅड. दत्तात्रय जाधव तसेच आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सतीश कराळे, उपाध्यक्ष डॉ. नितीन राजे-पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष बाबुराव कानडे, डॉ. अभिजित कवठेकर, प्रशांत सावंत, दिशा चव्हाण, विजय पाटील आदी उपस्थित होते.