
एकाच वेळी दोन हात आणि एका पायाने चित्र काढण्याचा जागतिक विक्रम करणारे जागतिक कीर्तीचे चित्रकार राबीन बार यांच्या चित्रांचे प्रदर्शन वरळी येथील नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत सुरू झाले आहे. ‘हू अॅम आय’ असे त्यांच्या कलाप्रदर्शनाचे शीर्षक आहे. प्रदर्शन 22 मेपर्यंत रसिकांना पाहता येईल.
राबीन बार यांनी दोनदा जागतिक विक्रम नोंदवला आहे. त्यांनी दोन्ही हात आणि एका पायाने एकत्रितपणे तीन मिनिटांत 30 स्केचेस काढली आहेत. त्यांच्या ‘हू अॅम आय’ प्रदर्शनाचे प्रदर्शनाचे उद्घाटन आज मुंबईचे माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. गणेश तरतरे, अभिनेते अशोक कुलकर्णी, चित्रकार गौतम मुखर्जी, परमेश्वर पॉल, प्रा. राजेंद्र पाटील, एच. आर. दास यांच्यासहित कलाक्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
मानव ही ईश्वराची सर्वश्रेष्ठ निर्मिती आहे. जात, पात, पंथ, रंग, लिंग, धर्म इत्यादींच्या नावावर आपल्यातील असंख्य भेदभावांनी प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न उभा केला आहे, ‘मी कोण आहे?’ राबीन बार यांची चित्रे या चिरंतन प्रश्नाचे उत्तर शोधणाऱया प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यात आणि हृदयात सुरू असलेल्या रहस्यमय संघर्षाचे दर्शन घडवतात.



























































