Video – ठाण्यात रस्त्यावरील पाण्याचा अंदाज न आल्याने कार थेट तलावात बुडाली, चालक बालंबाल बचावला

मुंबईसह ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले आहे. यामुळे अपघातांनाही आमंत्रण मिळत आहे. सोमवारी रात्री ठाण्यातील मुंब्रा परिसरातील खर्डीगाव फडकेवाडा येथे रस्त्यावरील पाण्याचा अंदाज न आल्याने कार थेट तलावामध्ये बुडाली. दैव बलवत्तर म्हणून कारचालक बालंबाल बचावला.

मुसधळार पावसामुळे तलावाचे पाणी हे तुडुंब भरून ओसांडून वाहून रस्त्यावर आले होते. रस्त्यावरील पाणी आणि तलावाचा अंदाज न आल्याने कार तलावात बुडाली. रात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेची माहिती मिळतात स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत वाहनचालकाला सुखरूप बाहेर काढले. अग्निशमन दल आणि ठाणे आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत कार बाहेर काढली.

बालंबाल बचावला कारचालक

सदर घटनेमध्ये कारचालक बालंबाल बचावला आहे. कारचालकाचे नाव वाय. पठान (वय – 28) असल्याची माहिती मिळाली असून तो एका खासगी कंपनीमध्ये ड्रायव्हरचे काम करतो. काम संपल्यानंतर तो मुंबईमधील घराकडे परतत असताना हा अपघात झाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamanaonline)

मुसळधार पावसामुळे परिसरातील रस्त्यांवर पाणी साचले होते. पावसामुळे समोरील दिसण्याचे प्रमाणही कमी झाले होते. रात्रीची वेळ आणि दृश्यमानता कमी असतानाही चालकाने तलावाजवळून गाडी नेण्याची जोखीम पत्करली. तलावातील पाणी आणि रस्त्यावर साचलेले पाणी याचा अंदाज न आल्याने कार तलावामध्ये बुडाली. चालक तत्काळ गाडीतून बाहेर पडल्याने पुढील अनर्थ टळला अशी माहिती ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी अविनाश सावंत यांनी दिली.