
कोलंबिया देशातून आलेल्या पुरुषाच्या पोटातून 78 ड्रग्जच्या पॅप्सूल सीमा शुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर विभाग (एआययू) ने जप्त केल्या. रॉबर्टो अलेक्स डिलेगडा असे त्याचे नाव आहे. ड्रग्ज आणण्याच्या मोबदल्यात त्याला 20 हजार डॉलर मिळाले होते, अशी माहिती तपासात समोर आली आहे.
मूळचा कोलंबिया देशाचा नागरिक असलेला रॉबर्टो हा गेल्या आठवडय़ात छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. त्याच्या हालचाली एआययूच्या अधिकाऱ्यांना संशयास्पद वाटल्या. त्यानंतर एआययूच्या अधिकाऱयाने रॉबर्टोला ताब्यात घेतले. तेव्हा त्याने पोटात दुखत असल्याचे सांगितले. हा प्रकार एआययूच्या अधिकाऱ्यांना संशयास्पद वाटला. एआययूच्या अधिकाऱयाने रॉबर्टोला जे. जे. रुग्णालयात दाखल केले. जे. जे. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी रॉबर्टोच्या पोटातून 78 ड्रग्ज असलेल्या पॅप्सूल बाहेर काढल्या. जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत कोटय़वधी रुपये आहे.
रॉबर्टो हा आदिस अबादा येथून ते ड्रग्ज घेऊन आला होता. ड्रग्जच्या तस्करीत रॉबर्टोला 20 हजार डॉलर मिळणार होते. अॅडव्हान्स म्हणून त्याला काही डॉलर दिल्याचे एआययूच्या तपासात समोर आले आहे. रॉबर्टोविरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.




























































