
राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातील डीएसपी हिरालाल सैनी यांचा महिला कॉन्स्टेबलसोबतचा एक अश्लिल व्हिडीओ व्हायरल झाला आहे. स्विंमिंग पूलमधील हा व्हिडीओ असून दोघांनी आठ वर्षाच्या मुलासमोर लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी पोलीस विभागाने कारवाई करत डीएसपी हिरालाल सैनी यांना निलंबित केले असून त्यांना अटकही करण्यात आली आहे. उदयपूरमधील एका रिसॉर्टमधून हिरालाल यांना अटक करण्यात आली.
10 जुलै रोजी महिला कॉन्स्टेबलच्या आठ वर्षांच्या मुलाचा वाढदिवस होता. हा वाढदिवस स्पेशल करण्यासाठी डीएसपी आणि महिला कॉन्स्टेबलने खास प्लान केला. हिरालाल सैनी यांनी पुश्करमध्ये एक फाईव्ह स्टार रिसॉर्ट अँड स्पामधील लक्झरी सूट बूक केला होता. येथे रुमसोबत खासगी स्विमिंग पूलही होता. या पूलमध्ये दोघांनी मुलाचा वाढदिवस साजरा केला.
पूलमध्ये वाढदिवस साजरा केल्यानंतर दोघांनी अश्लिल व्हिडीओ शूट केला. व्हिडीओमध्ये डीएसपी आणि महिला कॉन्स्टेबल आठ वर्षाच्या मुलासमोर लैंगिक संबंध ठेवताना दिसले. याचा व्हिडीओ महिला कॉन्स्टेबलने चुकून आपल्या स्टेटसला ठेवला. त्यानंतर याचा भांडाफोड झाला आणि व्हिडीओ व्हायरल झाला.
दरम्यान, पोलिसांनी चाईल्ड पोर्नोग्राफीप्रकरणी पॉस्को कायद्यांतर्गत डीएसपीला अटक केली आहे. न्यायालयाने डीएसपीला 17 दिवसांच्या पोलीस रिमांडमध्ये पाठवले आहे. पोलीस चौकशीमध्ये डीएसपी आणि महिला कॉन्स्टेबलचे पाच वर्षांपासून संबंध असल्याचे समोर आले आहे. डीएसपीसोबत असणाऱ्या संबंधांमुळे महिला कॉन्स्टेबलने पतीलाही सोडले होते.
ब्लॅकमेल करण्यासाठी व्हिडीओ बनवले
दरम्यान, डीएसपी हिरालाल सैनी याने महिला कॉन्स्टेबलजवळ आमचे 50 हून अधिक व्हिडीओ आणि फोटो असल्याचा म्हटले. हे व्हिडीओ तिने भविष्यामध्ये ब्लॅकमेल करण्यासाठी काढल्याचा आरोप सैनी यांनी केला.




























































