
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
राजधानी दिल्लीत सायंकाळी ५ वाजता अचानक आलेल्या धुळीचे वादळ आणि पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. मेट्रो आणि विमानसेवेवर परिणाम झाला. २८ विमानांचा मार्ग बदलण्यात आला.
दुपारनंतर दिल्लीत वातावरण बदलले. सायंकाळी पाच वाजता अंधारून आले. ताशी ८० कि.मी. वेगाने धुळीचे वादळ आले आणि पावसाला सुरुवात झाली. यामुळे घरी परतणाऱया चाकरमान्यांचे हाल झाले. त्यातच मेट्रोसेवेवरही परिणाम झाला. किमान २८ विमानांचा मार्ग बदलण्यात आला आहे.
उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा आणि मध्य प्रदेशातही वादळ आले आणि मान्सूनपूर्व पाऊस कोसळला.





























































