पान मसाला आणि गुटखानंतर राज्यात ई-सिगरेटवरही बंदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

तंबाखूजन्य पदार्थांएवढीच ई-सिगरेट घातक असते म्हणून राज्याच्या अन्न प्रशासन विभागाने त्यावर बंदी घातली आहे. यापूर्वी प्रशासनाने पान मसाला आणि गुटखावर बंदी घातली आहे. ई-सिगरेटसह वेप, ई-हुक्का तसेच हीट ऍन्ड बर्न सारख्या वस्तूंवरही बंदी घालण्यात आले आहे.

गेल्या वर्षी जुलै महिन्यात केंद्र सरकारने सर्व राज्यांना ई-सिगरेटवर बंदी घालण्याची सूचना केली होती. राज्याच्या अन्न व प्रशासन विभागाने राज्य  सरकारकडे ई-सिगरेटवर बंदी घालण्यासाठी शिफारस केली होती. ई-सिगरेटची खरेदी विक्री ऑनलाईन होते. या सिगरेटमुळे अनेक आजारो होऊ शकतात तसेच कर्करोग होण्याचीही शक्यता असते. अन्न प्रशासन विभागाच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी ई-सिगरेटवर बंदी घालण्याची शिफारस केली होती.

ई-सिगरेटमध्ये लेड, क्रोमियम, निकल सारखे धातू आणि फॉर्मल डीहायड सारखे केमिकलचा समावेश असतो. याच्या सेवनाने आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. ई सिगरेटच्या सेवनाने फुफ्फुसांवर घातक परिणाम होतात. त्यामुळे राज्य सरकारने यावर बंदी घातली आहे.