आचार संहिता उल्लंघन प्रकरणी भाजप उमेदवार सनी देओलला नोटीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने अभिनेता आणि भाजप उमेदवार सनी देओलला नोटीस बजावली आहे. प्रचाराची वेळ संपल्यानंतरही सनी देओलने शुक्रवारी पठाणकोटमध्ये सभा घेतली होती. त्या प्रकरणी आयोगाने ही कारवाई केली आहे.

सनी देओलने एक सभा घेतली. या सभेत सनीने एक लाऊड स्पीकर वापरला होता आणि या सभेत 200 लोक उपस्थित होते. प्रचाराची वेळ संपल्यानंतरही सनी देओलने प्रचार सभा घेतली. त्यामुळे त्याने आचारसंहितेचे उल्लंघन केले. मतदानाच्या 48 तासापूर्वी प्रचाराची वेळ संपते. त्यावेळीच सनीने सभा घेतली.

सनी देओल पंजाबच्या गुरुदासपूरमधून भाजपच्या तिकीटावर उभा आहे. त्याच्या विरोधात काँग्रेसकदून सुनील जाखड उभे आहेत.