Snake Venom Case : रेव्ह पार्टीत सापाचे विष वापरले! Bigg Boss OTT 2 चा विजेता गोत्यात, ED चे समन्स

YouTuber आणि Bigg Boss OTT 2 चा विजेता सिद्धार्थ यादव उर्फ ​एल्विश यादव याच्या अडचणींमध्ये पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. रेव्ह पार्टीत सापाचे विष वापरल्याच्या प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) एल्विश यादवला चौकशीसाठी समन्स बजावले आहे. एल्विशला 23 जुलै रोजी लखनऊला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. यापूर्वी ईडीने 8 जुलै रोजी नोटीस बजावली होती. मात्र एल्विशने परदेशात असल्याचे कारण देऊन काही दिवसांचा कालावधी मागितला होता.

मे महिन्यात ईडीने मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत एल्विश यादवविरोधात गुन्हा दाखल केला होता. यानंतर यूपी पोलिसांनी एल्विश आणि इतर संबंधित लोकांविरुद्ध एफआयआर नोंदवला होता आणि आरोपपत्रही दाखल केले होते. त्याच तक्रारीची दखल घेत ईडीने पुन्हा नोटीस बजावली आहे. दरम्यान या प्रकरणी ईडीने या आठवड्यात एल्विश यादवशी संबंधित राहुल यादव उर्फ ​राहुल फैजलपुरिया याची चौकशी केली आहे. फैजलपुरिया यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. गुन्ह्यातून पैसे कमवणे आणि रेव्ह पार्टीसाठी बेकायदेशीरपणे पैसे वापरणे याबाबत ईडी चौकशी करत आहे.

मार्चमध्ये केली होती अटक-
रेव्ह पार्ट्यांमध्ये सापाच्या विषाचा वापर केल्याच्या आरोपावरून नोएडा पोलिसांनी 17 मार्च रोजी एल्विश यादवला अटक केली होती. पोलिसांनी एल्विशविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हाही दाखल केला होता. या प्रकरणी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये नोएडा सेक्टर पोलीस ठाण्यात एल्विशसह 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीपल फोर ॲनिमल्स या स्वयंसेवी संस्थेने हा खटला दाखल केला आहे. या प्रकरणात उर्वरित पाच आरोपींनाही अटक करण्यात आली असून नंतर सर्वांची जामिनावर सुटका करण्यात आली.

‘बिग बॉस ओटीटी 2’चा विजेता एल्विश यादवला अटक;