गोलपोस्टच्या पलीकडचे – बेल्जियन हजार्डची निवृत्ती

साखळीतच आव्हान संपुष्टात आल्याने निराश झालेल्या 31 वर्षीय बेल्जियन स्टार फुटबॉलपटू इडन हजार्डने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून आपली निवृत्ती जाहीर केली आहे. 2008 सालापासून तो बेल्जियम संघाचे प्रतिनिधित्व करीत होता. वयाच्या 16 वर्षी राष्ट्रीय संघात पदार्पण करणाऱ्या हजार्डने 126 सामन्यात 33 गोल केले आहेत. 2008 सालापासून मी जे आनंदाचे क्षण अनुभवले आहेत, त्याबद्दलही मी आभारी आहे. आता निवृतीची वेळ झालीय. माझा उत्तराधिकारीही तयार आहे. मला तुमची आठवण येईल, असे हजार्डने सोशल मिडियावर दिलेल्या संदेशात म्हटले आहे.