दहावीत 100 टक्के गुण मिळवलेल्या 23 विद्यार्थ्यांनी निवडले आयटीआय; प्रवेशासाठी 1 लाख 70 हजार 399 अर्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दहावीच्या परीक्षेत 100 टक्के गुण मिळवलेल्या एकूण 23 विद्यार्थ्यांनी सायन्स, कॉमर्सकडे न जाता थेट राज्यातील शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच आयटीआयला पसंती दिली आहे. सर्वसाधारण गुणवत्ता यादीतील आकडेवारीनुसार, 100 टक्के गुण मिळवलेल्या 23 विद्यार्थ्यांनी आयटीआय प्रवेशासाठी अर्ज केला आहे. तर 95 ते 99 टक्के गुण मिळवलेल्या 40 विद्यार्थ्यांनी आणि 90 ते 95 टक्के गुण मिळवलेल्या 611 विद्यार्थ्यांनीही आयटीआयसाठी अर्ज केला आहे.

यंदा राज्यातील आयटीआय प्रवेशासाठी एकूण 1 लाख 70 हजार 399 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. यामध्ये 1 लाख 42 हजार 512 मुले आणि 27 हजार 807 मुलींचा समावेश आहे.

आयटीआय प्रवेशाचे वेळापत्रक

पहिल्या फेरीतील प्रवेश निश्चिती – 3 ते 7 जुलै

दुसऱ्या फेरीसाठी पर्याय भरणे – 3 ते 7 जुलै

दुसरी फेरीतील प्रवेश निश्चिती – 13 ते 16 जुलै

तिसऱ्या फेरीसाठी पर्याय भरणे – 13 ते 16 जुलै

तिसरी गुणवत्ता यादी – 21 जुलै

तिसऱ्या फेरीतील प्रवेश निश्चिती – 22 ते 25 जुलै

चौथ्या फेरीसाठी पर्याय भरणे – 22 ते 25 जुलै

चौथी गुणवत्ता यादी – 30 जुलै

चौथ्या फेरीतील प्रवेश निश्चिती – 31 जुलै ते 4 ऑगस्ट

नव्याने नोंदणी व अर्ज निश्चिती – 3 जुलै ते 4 ऑगस्ट