उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण, तब्येत ठणठणीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण झाली आहे़. उदय सामंत यांनी स्वतः ट्वि‌वीट करुन ही माहिती दिली आहे़. ‘माझा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे़. मी ठणठणीत असून पुढील आठवड्यात जनतेच्या सेवेत पुन्हा रुजू होईन’ असे उदय सामंत यांनी म्हटले आहे़.

राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासोबत त्यांनी प्रवास केला होता़. काही दिवसांनी राज्यमंत्री बच्चू कडू हे कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना क्वारंटाईन व्हावे लागले होते़ आज उदय सामंत यांनी ट्विट करुन त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले़. दरम्यान क्वारंटाईन काळातही त्यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या महत्वाच्या बैठका घेतल्या होत्या़.