जम्मू कश्मीरमध्ये भीषण अपघात, कार दरीत कोसळून आठ जणांचा मृत्यू

702

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू कश्मीरमध्ये एक सुमो गाडी दरीत कोसळली. या गाडीत आठ प्रवासी होते आणि या अपघातात सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार टाटा सुमो मध्ये आठ प्रवासी होते. ही गाडी शेअर तत्वावर उखडाल ते आलनबास या दरम्यान जात होती. चालकाचा गाडीवरून ताबा सुटल्याने गाडी थेट दरीत कोसळली.

अपघाताची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली. तेव्हा स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी मिळून बचाव कार्य सुरू केले. तेव्हा चार जणांचा आधीच मृत्यू झाला होता. इतर जखमींना तातडीने जवळच्या इस्पितळात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला होता.  या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या