गोपीनाथ मुंडे असते तर शिवसेना-भाजप युती कायम राहिली असती-  एकनाथ खडसे

1515
eknath-khadse

गोपीनाथ मुंडे यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी चांगले संबंध होते. त्यांची भूमिका सदैव समन्वयाची असायची. आज ते असते तर कदाचित शिवसेना आणि भाजप युती कायम राहिली असती. भाजपची आज जी अवस्था आहे त्यापेक्षा निश्चित चांगली अवस्था राहिली असती असे सांगत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला.

भाजप नेत्या पंकजा मुंडे स्वाभिमान मेळाव्याचे आयोजन केले आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर खडसे यांनी बुधवारी मुक्ताईनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधत मुंडेंच्या आठवणींना उजाळा देऊन आपल्या भावनांना काट करून दिली. गोपीनाथ मुंडे आज असते तर माझ्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्याकर अन्याय झाला नसता अशी खंत खडसे यांनी व्यक्त केली. गोपीनाथ मुंडे यांच्या जाण्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण तर झालीच, ते आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना एक आधार वाटत होते असे खडसे म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या