मी ब्राह्मणाला मुख्यमंत्रीपद दान दिलं – खडसे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी प्रवेशावेळी माजी मुख्यमंत्री फडणवीस यांना व्हिलन ठरविल्यानंतर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

खडसे एका जाहीर कार्यक्रमात म्हणाले, आम्हाला सांगितलं गेलं, नाथाभाऊ तू आता घरी बैस. मला मुख्यमंत्री व्हायचं आहे. नाथाभाऊवर मुक्ताबाईचा आशीर्वाद आहे, त्यामुळे मी म्हटलं, घे रे, तू भी क्या याद करेगा.

मी भल्या भल्यांना दान देतो तर ब्राह्मणांना दान द्यायला काय हरकत आहे, अशा शब्दांत त्यांनी फडणवीसांवर जोरदार टीका केली.

आपण भाजपा का सोडली याचे कारण सांगताना खडसे म्हणाले, ‘भाजपानं एका व्यक्तीच्या लाडापोटी माझ्यासारख्यांना बाजूला केलं.

एका व्यक्तीमुळे सरकारचं वाटोळं झालं. या अशा लोकांमुळे मला भाजपा सोडवी लागली. जिथे आपलेच गद्दार होतात त्या घरात राहून काय उपयोग आहे. यांच्यापेक्षा दिलदार शत्रू बरा. कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा. मी अख्खं आयुष्य भारतीय जनता पक्षाला दिलं. माझा मुलगा गेला तरीही मी भाजपाशी एकनिष्ठ राहिलो. पण मला एका माणसानं छळलं,’ अशा शब्दांत त्यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली.