कोल्हापूर शहराचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मंजूर निधीतून कोल्हापूर शहराचा कायापालट होईल. तसेच शहरातील प्रमुख प्रश्न लवकरच मार्गी लावण्याबाबत शासनस्तरावर सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन देत नगरविकास मंत्री म्हणून कोल्हापूर शहरास न्याय देण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही शिवसेना नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱयावर आले असता शिवसैनिकांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, शिवसेना सहसंपर्कप्रमुख खासदार संजय मंडलिक, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.