‘पद्मश्री’ पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांना ‘एकता कला गौरव पुरस्कार’ जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या मधुर आवाजाने आणि संगीताच्या जोरावर असंख्य श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱया चतुरस्र गायिका व संगीतकार ‘पद्मश्री’ पुरस्कार विजेत्या पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांना या वर्षीचा ‘एकता कला गौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. अभिजित राणे, अशोक लोटणकर, प्रतिभा सराफ, श्रीकांत जाधव, वैशंपायन गमरे, किरण आव्हाड, रामचंद्र के. यांचासुद्धा अन्य पुरस्कार प्राप्त नामवंतांमध्ये समावेश आहे.

एकता पुरस्काराची घोषणा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कवी प्रकाश गणपत जाधव यांनी केली. कवी, पत्रकार भगवान निळे, कवी, साहित्यिक अजय कांडर, हिंदी साहित्यिक रमेश यादव यांच्या निवड समितीने विविध पुरस्कारांची निवड केली आहे. येत्या 13 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 4 वाजता गिरगाव येथील साहित्य संघ मंदिर येथे आयोजित विशेष समारंभात एकता महोत्सवाचा सांगता सोहळा आणि पुरस्कार व पारितोषिके वितरण समारंभ संपन्न होणार आहे, असे एकता महोत्सवाचे सचिव कवी प्रकाश पाटील आणि उपाध्यक्ष उज्जय आंबेकर यांनी कळवले आहे.