मतदार याद्या पुनरिक्षण कार्यक्रमास मुदतवाढ

285

विधानसभा निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने मतदार याद्यांच्या पुनरिक्षणाचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने हाती घेतला आहे. या कार्यक्रमास मुदतवाढ देण्यात आली असून 31 ऑगस्टला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2019 या अहर्ता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम निर्धारित केला आहे. या कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती निकाली काढणे 24 ऑगस्ट, मतदार यादीची विशेष तपासणी करणे 27 ऑगस्ट व अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यास 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे आदेश अ. ना. वळवी सह. मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिले.

आपली प्रतिक्रिया द्या