
साताऱ्यात अनेक वर्षांपासून काम सुरू असलेले छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय पूर्ण झाल्यानंतर तेथे जम्बो कोविड सेंटर सुरू करून अनेकांचे प्राण वाचवले गेले आहेत. आता कोरोना संपत आल्यावर तिथे खऱया अर्थाने संग्रहालय दिमाखात सुरू होण्याची गरज आहे. मात्र, प्रशासन तिथे कासला जाणाऱया बसेससाठी इलेक्ट्रिक चार्ंजग स्टेशन सुरू करत आहे. याला विरोध करत आज सातारा शहर शिवसेनेने संग्रहालयाच्या परिसरात तीव्र आंदोलन केले.
छत्रपती शिवाजी संग्रहालयाची इमारत सुसज्ज झाली आहे. मात्र, तिथे जम्बो कोव्हिड सेंटर सुरू केल्यानंतर संग्रहालय सुरू करण्याचे राहून गेले होते. कोरोना काळात या संग्रहालयात खऱया अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचेच कार्य झाले. तिथे कोरोनाबाधितांवर उपचार होऊन अनेकांचे प्राण वाचले. आता जम्बो कोविड सेंटर बंद झाले. आता लवकरच तिथे संग्रहालयाच्या जुन्या इमारतीतून इतिहासकालीन दुर्मिळ वस्तू तिथे हलवण्यात येतील व छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय दिमाखात सुरू होईल, अशीच सातारकरांची भावना होती. मात्र, जिल्हा प्रशासनाने तिथे काससाठी इलेक्ट्रिक बस सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी तिथे चार्ंजग स्टेशन उभारण्याचा घाट घातला. आता चार्ंजग स्टेशन उभारले असून, डेमोही झाला आहे. ही बाब सातारकरांना खटकत होतीच. गुरुवारी सातारा शहर शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय परिसरात या चार्ंजग स्टेशनला विरोध करण्यासाठी जोरदार आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी शिवसेना पदाधिकाऱयांना ताब्यात घेतले. जर चार्ंजग स्टेशनवर प्रशासन ठाम राहिले तर शिवसेनेतर्फे आंदोलन आणखी तीव्र केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. आंदोलनात शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे, गणेश अहिवळे, प्रणव सावंत, सागर धोत्रे, सादिक बागवान तसेच शिवसैनिक सहभागी झाले होते.




























































