एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा ऑफलाइन घ्या! शिक्षक परिषदेची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा (शासकीय रेखाकला परीक्षा) ऑफलाइन घेण्याची मागणी कला संचालनालयाकडे करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असून राज्यातील शाळादेखील ऑफलाइन पद्धतीने सुरू झाल्या आहेत. त्यामुळे एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटची ऑनलाइन परीक्षा न घेता ऑफलाइन परीक्षा घेण्याची मागणी होत आहे.

कला संचालनालयाच्या वतीने 12 व 13 फेब्रुवारी रोजी इंटरमिजिएट व 14 आणि 15 फेब्रुवारी रोजी एलिमेंटरी ऑनलाइन परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून शाळादेखील आता सुरू झाल्या आहेत. चित्रकला ग्रेड परीक्षा या प्रात्यक्षिक स्वरूपाच्या असून ऑफलाइन घेण्यात याव्यात, अशी मागणी राज्यातील कलाशिक्षकांकडून केली जात आहे. कला संचालनालयाने विद्यार्थ्यांची नोंदणी, निकाल, प्रमाणपत्र याचे नियोजन ऑनलाइन करण्यात यावे; परंतु परीक्षा ऑफलाइन घ्यावी, असे शिक्षकांचे म्हणणे आहे.