जय जवान! प्रचंड हिमवर्षाव सुरू असतानाही दोन दहशतवाद्यांना टिपलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
encounter-underway-between-jawan-terrorist

सामना ऑनलाईन । श्रीनगर

जम्मू-कश्मीरमध्ये सुरू असलेल्या हिमवर्षावात देखील हिंदुस्थानचे जवान आपली कर्तव्य चोख बजावत आहेत. बडगाम जिल्ह्यातील झिंपांचल येथे चरी शरिफ भागात हिंदुस्थानच्या जवानांची दहशतवाद्यांशी चकमक उडाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात हिंदुस्थानच्या लष्कराला यश आले आहे.

झिंपांचल येथे चरी शरिफ भागात काही दहशतवादी लपल्याची माहिती लष्कराला मिळाली. त्यानंतर गस्तीवर असलेल्या पथकाने या भागाला घेरले आणि दहशतवाद्यांनी मात्र पथकावर गोळीबार सुरू केला. त्याला जवनांनी चोख प्रत्युत्तर दिले. या वेळी दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात त्यांना यश आले. मात्र अद्यापही चकमक सुरू आहे.